मुंबई येथील कुस्ती स्पर्धेत वेंगुर्ले महाविद्यालयाच्या नित्यानंद वेंगुर्लेकर ने पटकाविले कास्यपदक

वेंगुर्ले : प्रतिनिधी
ठाणे-शहापूर येथे सोनूभाऊ बसवंत महाविद्यालयात मुंबई विद्यापिठाच्या कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या. यात वेंगुर्ला येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील तृतीय वर्ष विज्ञान शाखेचा विद्यार्थी नित्यानंद सुदेश वेंगुर्लेकर याने ७९ किलो वजनी गटात मुंबई विद्यापिठाचे कास्यपदक प्राप्त केले.

त्याच्या या यशाबद्दल प्राचार्य डॉ.धनराज गोस्वामी व संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी क्रीडा संचालक प्रा.जे.वाय.नाईक, जिमखाना चेअरमन प्रा.के.आर.कांबळे, प्रा.डी.ची.राणे, प्रा.बी.एम.भैरट, एस.एस.पाटील, प्रा.डी.जे.शितोळे, प्रा.एस.एस.चमणकर आदी उपस्थित होते. कु.नित्यानंद याला शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा.जयकुमार देसाई, चेअरमन प्रा.डॉ. मंजिरी मोरे-देसाई, पेटून कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.