जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या
जागांसाठी सावंतवाडीत आरक्षण सोडत 
सावंतवाडी । प्रतिनिधी : आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी सावंतवाडी तालुक्यातील विविध गावांच्या गट व गण आरक्षण सोडतीचा बहुप्रतिक्षित कार्यक्रम आज प्रांताधिकारी हेमंत निकम आणि तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. चिठ्ठीद्वारे झालेल्या या पारदर्शक सोडतीमुळे अनेक इच्छुकांच्या राजकीय आशा पल्लवित झाल्या आहेत, तर काहींच्या उमेदवारीवर पाणी फिरले आहे. विशेष म्हणजे, सभापती पदासाठी अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाल्याने तळवडेच्या पंचायत समिती महिला सदस्याला सभापती पदाची मोठी संधी मिळणार आहे.
पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, सर्वांचे लक्ष लागून राहिलेली गट व गण आरक्षण सोडत आज येथील तहसीलदार कार्यालयात जाहीर करण्यात आली.
तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या सोडत कार्यक्रमात चिठ्ठ्या काढण्याचा मान तशुषी जाधव आणि भक्ती मुळीक या लहान मुलींना देण्यात आला.
आरक्षण सोडतीनुसार कलंबिस्त, आंबोली, मळगाव, माजगाव, न्हावेली, इन्सुली, सातार्डा सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत. तर, माडखोल, कारिवडे, चराठे, मळेवाड, बांदा, तांबोळी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत.
इतर मागासवर्गीय प्रवर्गातील आरक्षणाचा विचार केल्यास, कोलगाव आणि आरोंदा नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना. मा.प्र.) महिला यांच्यासाठी, तर विलवडे आणि शेर्ले हे नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना.म.प्र. सर्वसाधारण) प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत.
*तळवडेला सभापतीपदाची लॉटरी*
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पंचायत समिती सभापती पदासाठी तळवडे पंचायत समिती प्रभाग अनुसूचित जाती (अनु. जाती) महिला प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. त्यामुळे तळवडेतून निवडून येणाऱ्या अनुसूचित जातीच्या महिला सदस्यास थेट सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती पदाची संधी मिळणार असल्याने तळवडेमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यामुळे सभापती पदाचा चेहरा तळवडेतून निश्चित होणार आहे.
हा संपूर्ण आरक्षण सोडतीचा कार्यक्रम प्रांताधिकारी हेमंत निकम आणि तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत पारदर्शकपणे पार पाडण्यात आला. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संभाव्य उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाल्यामुळे आता विविध पक्षांनी आणि उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी आणि तयारी सुरू केली आहे. आगामी पंचायत समिती निवडणुकीत रंगत वाढणार असल्याचे या सोडतीवरून स्पष्ट होत आहे.
तर जिल्हा परिषद निवडणूकीच्या आरक्षणात सावंतवाडी तालुक्यातील एकूण नऊ मतदार संघात आरक्षण सोडत काढण्यात आली. यात आंबोली मतदार संघात सर्वसाधारण महिला तर मळेवाड व माडखोल मतदारसंघात नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण निश्चित झाले. तर उर्वरीत तळवडे, माजगांव, आरोंदा, बांदा, कोलगांव आणि इन्सुली हे मतदार संघ सर्वसाधारण खुल्या गटासाठी आरक्षित झाले आहे.
तळवडे मतदारसंघ सर्वसाधारण खुला,












