Breaking : रत्नागिरी पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर

Breaking News label banner isolated vector design
कुणासाठी लागली लॉटरी; कुणाची गेली संधी पहा 

रत्नागिरी: रत्नागिरी पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठीची बहुप्रतिक्षित आरक्षण सोडत आज काढण्यात आली असून, एकूण वीस गणांसाठीचे आरक्षण निश्चित झाले आहे.

उपविभागीय अधिकारी जीवन देसाई आणि तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या नियंत्रणाखाली ही प्रक्रिया पार पडली.

​आरक्षणानुसार गणांची स्थिती खालीलप्रमाणे आहे:

 

महिलांसाठी राखीव प्रवर्ग

​वाटद, कळझोंडी, नेवरे, झाडगाव म्यु. हद्दी बाहेर, गावखडी आणि भाटये हे 6 गण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत.

 

​खालगाव, हातखंबा, आणि कर्ला या गणांमध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (OBC) महिला यांना संधी मिळाली आहे.

 

 

​ ​सर्वसाधारण जागा:

​करबुडे, कोतवडे, साखरतर, खेडशी, केळये, कुवारबाव, नाचणे, आणि गोळप हे आठ गण सर्वसाधारण गट/प्रवर्ग म्हणून खुले आहेत.

मागासवर्गीयांसाठी राखीव:

​नाणीज गण अनुसूचित जाती प्रवर्ग (SC) साठी राखीव झाला आहे.

 

 

​हरचिरी आणि पावस हे 2 गण नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (OBC) साठी आरक्षित झाले आहेत.

 

​या आरक्षणामुळे इच्छुकांमध्ये आता हालचालींना वेग येणार असून, निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.