आचरा–अर्जुन बापर्डेकर
रस्त्यावर घडणाऱ्या अपघातांपैकी बहुतांशी अपघात हे मोटरसायकलचे आहेत.त्यात हॅलमेट न घातल्यामुळे जीव गमावण्याचे प्रमाण जास्त आहे.काहीजण व्यवस्थित दिसण्यासाठी हॅलमेट वापरत नाहीत पण
व्यवस्थित दिसण्यापेक्षा सुरक्षा महत्त्वाची आहे.डोक्यावरचे केस विस्कटले तरी विंचरता येतात.मात्र हॅलमेट न वापरल्याने गेलेला जीव परत मिळविता येत नाही.यासाठी दुचाकी चालवताना प्रत्येकाने हॅलमेट वापरण्याचे आवाहन सिंधुदुर्ग पोलीस अधिक्षक मोहन दहिकर यांनी आचरा येथे केले.
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत
सिंधुदुर्ग पोलीस दल व उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोटारसायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते.
सदर रॅली देवगड कुणकेश्वर करून आचरा येथे आल्यावर सरपंच जेराॅन फर्नांडिस यांच्या हस्ते तीचे स्वागत करण्यात आले.यावेळी आयोजित कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते.यावेळी त्यांच्या सोबत
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी आढाव, आचरा पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार,उपसरपंच संतोष मिराशी,वायंगणी सरपंच रुपेश पाटकर,आचरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी मुजावर, व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी, न्यू इंग्लिश स्कूल समिती अध्यक्ष फर्नांडिस, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिनाक्षी देसाई यांसह बहुसंख्य पोलीस कर्मचारी,पोलीस पाटील, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी वाहन चालवताना घ्यावयाची काळजी या बाबत मार्गदर्शन केले .कार्यक्रमाच्या सुरुवातीला आचरा काॅलेजच्या मुलांनी रस्ता सुरक्षेबाबत पथनाट्यातून जनजागृती केली.













