दीपावलीनिमित्त सोनू सावंत मित्रमंडळातर्फे नरकासुर स्पर्धेचे आयोजन

कणकवली :दीपावली सणाचे औचित्य साधून सोनू सावंत मित्रमंडळातर्फे रविवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी वरवडे-फणसवाडी येथे रात्री ८.३० वाजता नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या स्पर्धेसाठी पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे ७,००१ रुपये, ५,००१ रुपये आणि ३,००१ रुपये अशी आकर्षक रोख बक्षीसे देण्यात येणार आहेत. तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला चषकाचे वितरण करण्यात येईल.

 

या स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी अनिल घाडीगावकर, केतन घाडीगावकर आणि हनुमंत बोंद्रे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.