पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे मंगेश लोकेंची मागणी
वैभववाडी प्रतिनिधी :
उंबर्डे, वैभववाडी ते फोंडा या प्रमुख मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. रस्ता दुरावस्थेमुळे वारंवार अपघात होत आहे. या रस्त्याला अंदाजे 125 कोटींची तरतूद राज्य शासना मार्फत व्हावी. या मागणीचे निवेदन पालकमंत्री नितेश राणे यांना माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी मुंबई येथे दिले.
या रस्त्यावरून वाहतूक करताना वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. ठिकठिकाणी रस्त्याची चाळण झालेली आहे. अनेक वेळा या मार्गावर अपघात होवून काही माणसे दगावली आहेत. हा राज्यमार्ग सुधारणे व काँक्रीटीकरण करणे (बाजूपट्टी, सुधारणा, काँक्रीट गटारासह) होणे गरजेचे आहे.
यासाठी आपल्या स्तरावरून विशेष प्रयत्न करून आचरा, कणकवली, केनडी,फोंडा,उंबर्डे रस्ता रा. मा.181 कि.मी. 63/750 ते 88/850 (बाजूपट्टी, सुधारणा, काँक्रीट गटारासह) होणे गरजेचे आहे. असे निवेदनात म्हटले आहे.












