बापर्ड्यात बिबट्याने केली कुत्र्याची शिकार

देवगड/ प्रतिनिधी
तालुक्यातील बापर्डे गायकवाडवाडी येथील ग्रामपंचायतीनजीक वास्तव्यास असणारे सुनिल मधुकर कदम यांच्या घरासमोरील प्रांगणात मध्यरात्रीच्या सुमारास झोपलेल्या कुत्र्यावर झडप घालून बिबट्याने त्याची शिकार केली. हा प्रकार २ जुलै रोजी मध्यरात्री २.३० च्या सुमारास घडला असून शिकरीची ही घटना श्री. कदम यांच्या घराबाहेरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे बापर्डे गावामध्ये बिबट्याचे अस्तित्व समोर आले असून भरवस्तीत बिबट्याच्या मुक्त होत असलेल्या संचारामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्याचा वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.