पळसंब येथे सापाला जीवदान!

मसुरे | झुंजार पेडणेकर : पळसंब गावठणवाडी येथे अशोक जुवेकर यांच्या घरा नजिक आढळून आलेल्या नाग जातीच्या सापाला मसुरे येथील सर्पमित्र रमण पेडणेकर यांनी सुरक्षित रित्या पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. सदर ठिकाणी सर्प असल्याची माहिती अथर्व गोलतकर यांनी पळसंब माजी सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर यांना देताच गोलतकर यांनी त्वरीत सर्प मित्र श्री. रमण पेडणेकर यांना पाचारण करत सदर सर्पास तात्काळ पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.

पर्यावरणातील संतुलन ठेवताना साप हे भक्षक म्हणून काम करतात आणि परिसंस्थेतील अन्नसाखळीचा एक महत्त्वाचा भाग आहेत. त्यांच्यामुळे पर्यावरणातील संतुलन राखले जाते.

कोणतेही सरपटणारे प्राणी घरात किंवा घराशेजारी आल्यास घाबरू न जाता त्यांना न मारता त्वरीत सर्प मित्राशी सपर्क साधावा असे आवाहन माजी सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर यांनी केले आहे.