देवगडमध्ये नाद येथे तुळशीविवाहावेळी काेयत्याने हल्ला; बापलेकाविराेधात गुन्हा दाखल

जमिनीच्या वादातून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आराेप; युवक जखमी

देवगड ः प्रतिनिधी
देवगड तालुक्यातील नाद धनगरवाडी येथे तुळशीविवाह असताना झालेल्या वादातून काेयत्याने हल्ला केल्याची घटना दि. 22 नाेव्हेंबर राेजी रात्री 8 वा.सुमारास घडली. या प्रकरणी संजय शिंदे यांनी दिलेल्या िफर्यादीवरून देवगड पाेलिस स्थानकात संशयित रामचंद्र बाबाजी शिंदे (वय 52) आणि आशिष रामचंद्र शिंदे (वय 26, दाेघेही रा. नाद धनगरवाडी, देवगड) यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात संजय धाेंडू शिंदे (वय 29) हे जखमी झाले असून त्यांच्यावर कणकवली येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.

पाेलिसांत दाखल िफर्यादीनुसार, रविवार 22 नाेव्हेंबर 2026 राेजी नाद धनगरवाडी येथे सायंकाळी सात वाजल्यापासून तुळशी विवाहाचा कार्यक्रम सुरू हाेता.संजय शिंदे यांच्या घरी तुळशीचे लग्न असताना रात्री आठच्या सुमारास त्यांच्या घराशेजारी राहणारे त्यांचे काका रामचंद्र बाबाजी शिंदे हे दारू पिऊन तेथे आले. यावेळी त्यांनी वाडीतील संजय विठ्ठल वरक यांच्याशी वाद घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दाेघांमध्ये बाचाबाची सुरू झाल्याने संजय धाेंडू शिंदे हे मध्यस्थी करण्यासाठी गेले.

यावेळी संजय यांनी रामचंद्र शिंदे यांना आपल्याला शिवीगाळ करू नकाेस, अन्यथा पाेलिसांत तक्रार करेन, असे सांगतले यावेळी रामचंद्र शिंदे यांंचा मुलगा आशिष हा शिवीगाळ करीत हातात काेयता घेवून तेथे आला व तुम्ही वाटेत भेटा तुम्हाला संपवून टाकीन अशी संजय शिंदे आणि संजय विठ्ठल वरक यांना उद्देशून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे िफर्यादीत नमूद आहे.

त्यानंतर आशिष याने काेयत्याने संजय शिंदे यांच्या डाव्या दंडावर, डाव्या खांद्यावर, पाठीच्या मध्यभागी, मनगटावर तसेच डाव्या कुशीवर वार केल्याचा आराेप आहे. या हल्ल्यात त्यांना दुखापत हाेऊन रक्त येऊ लागले. घटनेनंतर त्यांचे मित्र राजेश जनार्दन आयरे यांनी त्यांना उपचारासाठी कणकवली येथील शासकीय दवाखान्यात नेले. उपचार घेतल्यानंतर संजय शिंदे यांनी देवगड पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी देवगड पाेलीस स्थानकात भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 118(2), 3(5), 351(2) आणि 352 अन्वये दाेघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलीस हवालदार आशीष कदम हे तपास करीत आहेत.