कणकवली न. पं. च्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे लाभार्थ्यांना आवाहन
कणकवली : कणकवली नगरपंचायत हद्दीतील पंतप्रधान आवास योजना (शहरी) २ अंतर्गत नवीन घरकुल मंजुरी देण्याकरिता इच्छुक लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन न.पं.च्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
देशभरात पंतप्रधान आवास योजना (शहरी) २ अंतर्गत नवीन घरकुल योजना राबविण्यात येत आहे. याचा कणकवली शहरातील इच्छुक लाभार्थ्यांनी घेण्याचे आवाहन न. पं. प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
याकरिता अर्जदाराचे मोबाईल लिंक असलेले आधारकार्ड आवश्यक आहे. आधारकार्ड संलग्न बॅक खाते पासबुक, एससी, एसटी किंवा ओबीसीचे जातप्रमाणपत्र, शिधापत्रिका, घरपत्रक उतारा, कुटुंबातील सदस्यांचे आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखल, जागेचे कागदपत्र, मतदान कार्ड, चालू वर्षाची कर भरणा केल्याची पावती ही कागदपत्रे घरकुल मंजुरीसाठी आवश्यक आहेत.
भारतामध्ये लाभार्थी किंवा कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे पक्के घर नसावे, लाभार्थ्याने गेल्या २० वर्षांत कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा, लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न ३ लाखांपर्यंत असले पाहिजे, अशी अटी आहेत. घरकुल योजनेचा लाभ घेणाऱ्यां लाभार्थ्यांनी संपूर्ण कागदपत्रांच्या मूळप्रतींसह ऑनलाईन नोंदणी करून भरलेल्या अर्जासोबत कागदपात्रांच्या झेरॉक्सप्रती कणकवली न.पं. कार्यालयात जमा कराव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.











