चिपळूण : चिपळूणच्या युनायटेड हायस्कूलच्या माजी कर्मचारी वर्गाचा स्नेहमेळावा गुरुवारी दि. १६ रोजी सायंकाळी ५ ते ६.३० वाजेपर्यंत चिपळूणच्या ब्राह्मण सहाय्यक संघाच्या कै. बाबासाहेब बेडेकर सभागृहात उत्साहात झाला. शाळेच्या माजी कर्मचारी वर्गापैकी सुमारे ३४ कर्मचारी चिपळूणमध्ये राहतात. काही अपरिहार्य कारणामुळे काही लोक उपस्थित राहू शकले नाहीत. तरीही १८ कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
शिक्षक, क्लार्क, शिपाई यांचा त्यात समावेश होता. जुन्या काळातील आठवणींची उजळणी झाली. मग श्रीमती शालन रानडे यांनी जेष्ठ नागरिकांच्या चालण्याच्या स्पर्धेत दोनवेळा प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल, संजय भागवत यांनी युरोप दौरा केल्याबद्दल, मधुकर जोशी पंत यांचा सर्वात ज्येष्ठ कर्मचारी म्हणून, तसेच श्रीमती खाडिलकर या पणजी झाल्याबद्दल, सौ. इप्ते यांचा दापोली येथील कुणबी समाजाच्या वसतिगृहाच्या कामात सहभागी झाल्याबद्दल आणि श्री. केतकर यांचा ब्राह्मण संघात भरघोस काम केल्याबद्दल फुल देऊन सन्मान करण्यात आला. मग सर्वांचा एकत्र फोटो काढण्यात आला. या कमी कापसाळ येथील कु. साळवी यांचे सहकार्य लाभले. मेळाव्याच्या अखेरच्या टप्प्यात सर्वांसाठी बटाटे वडा आणि चहा याचे आयोजन केले होते. याचे प्रायोजकत्व सौ. वैशाली केतकर यांनी स्वीकारले. चहापान झाल्यावर सर्वांनी परस्परांचा निरोप घेतला. गेली सुमारे १५ वर्षे हे मेळावे होत आहेत.













