सावर्डे बाजारपेठेत कल्याण मटका जुगारावर पोलिसांची कारवाई

चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील सावर्डे बाजारपेठेत विनापरवाना कल्याण मटका जुगार खेळवत असल्याप्रकरणी सावर्डे पोलिसांनी एका ४२ वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी रोख रकमेसह जुगाराचे साहित्य असा एकूण ७३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश नारायण कदम (४२, रा. खोतवाडी, कदमवाडी, सावर्डे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. दि. १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.१० वाजण्याच्या सुमारास सावर्डे बाजारपेठेतील कोकाटे दुकानाच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या खोकीत आरोपी विनापरवाना कल्याण मटका जुगार खेळवत असल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलीस हवालदार गगनेश पटेकर यांनी फिर्याद दिली. त्यानुसार २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.४० वाजता सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी ७३० रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ७३५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सावर्डे पोलीस पुढील तपास करीत आहेत.