संचालक बाबा परब, शाखा व्यवस्थापक मंदार चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तारकर्ली शाखेमार्फत आज शाखेमध्ये १९ कर्जदार सभासदांना वाहनांचे वितरण करण्यात आले. बँकेच्या माध्यमातून कर्ज घेऊन नवीन वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी हा वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. सहा चारचाकी, एक रिक्षा आणि बारा दुचाकी या वाहनांचा कर्ज वाटपात समावेश होता. कर्जदार सभासदांना त्यांच्या नवीन वाहनांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.
बँकेचे संचालक संदीप उर्फ बाबा परब, बँकेचे शाखा व्यवस्थापक मंदार चव्हाण, माजी व्यवस्थापक देवानंद लोकेगावकर, बँकेचे कर्मचारी माधव गोसावी, गौरवी तळवडेकर, शिंदे गटाचे उपतालुकप्रमुख विजय चव्हाण, हॉटेल व्यावसायिक नमिता गावकर, तारकर्ली ई सेवा केंद्राचे किरण मिस्त्री यांसह अन्य मान्यवर आणि कर्जदार सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तारकर्ली शाखेच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.











