श्री क्षेत्र कुणकेश्वर दीपोत्सव २०२५ भव्य आयोजनासह भक्तिमय वातावरणात साजरा होणार उत्सव

दीपोत्सव आयोजनाचे यावर्षीचे हे ९ वे वर्ष

देवगड l प्रतिनिधी :         श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर यांच्या वतीने यंदाही दीपावली पाडवा श्री क्षेत्र कुणकेश्वर दीपोत्सव २०२५ मोठ्या भक्तिभावात आणि सांस्कृतिक उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या वर्षीचा दीपोत्सव बुधवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजल्यापासून सुरू होईल. मंदिर परिसर दीपोत्सवाच्या प्रकाशात उजळून निघणार असून, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भाविकांना भक्तिमय अनुभव मिळणार आहे.

 

मंदिर परिसरामध्ये रांगोळी प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच एकवीस हजार पाणत्याची आरासची दीपज्योत आरास आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. या आरासेच्या आयोजनासाठी प्रत्येकी पणतीला १०/- रुपये देणगी निश्चित करण्यात आली आहे. ट्रस्टच्या वतीने सर्व भाविकांना सहभागी होऊन दीपोत्सव यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

या कार्यक्रमानिमित्त “स्वर श्रीपाद” या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. या मैफिलीत प्रसिद्ध गायक कलाकार श्रीपाद शांताराम जांबळेकर (मळगाव,गोवा) तसेच गायिका करिश्मा शेटकर (गोवा) युवा गायक साईश नाईक (गोवा) यांचे सुमधुर गायन रसिकांना ऐकायला मिळणार आहे. त्यांना साथ देणार आहेत केतन च्यारी (गोवा)कीबोर्ड, सिन्थेसाईझर), श्री राज मडगांवकर (गोवा तबला) ,प्रतीक धामस्कर,(गोवा)(संवादिनी)

प्रतीम धामस्कर (पखवाज/टाळ) तर या मैफिलीचे सूत्रसंचालन सी. अलीशा नाईक करणार आहेत. दीपावली पाडव्यानिमित्त आयोजित दीपोत्सव कार्यक्रमादरम्यान होणारे कार्यक्रम असे मुख्य मंदिरामध्ये मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन सायं ७:००,मंदिर व परिसरातील दीपज्वलन सोहळा सायं ७:१५ , स्वर श्रीपाद (गोवा) सांज मैफल सायं ६:०० ते ८:३०,सन्मान सोहळा रात्री ८:३० ते ९:००, पालखी प्रदक्षिणा सोहळा रात्री ९:०० ते ९:३०,सांगता रात्री ९:३० आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत. अशी माहिती कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ दिली यांनी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मी बराबर झाली दिली. यावेळी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे खजिनदार उदय पेडणेकर, अरविंद वाळके, महेश जोईल आदी उपस्थित होते.

या भव्य दीपोत्सवाच्या निमित्ताने श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टतर्फे सर्व भक्तजनांना, भाविकांना आणि नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पारंपरिक उत्सवात सहभागी व्हावे आणि श्री देव कुणकेश्वरांच्या कृपेचा लाभ घ्यावा.