भेडशीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. बाबूराव पार्सेकर यांचे निधन

 

ऍड नकुळ पार्सेकर यां ना बंधू शोक,

दोडामार्ग : भेडशी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, बँक ऑफ इंडियाचे माजी कर्मचारी तसेच साटेली भेडशी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य श्री. बाबूराव पार्सेकर (वय ७२) यांचे आज पहाटे गोवा बांबोळी येथील इस्पितळात उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले.

 

ते काही काळ आजारी होते आणि त्यांच्यावर गोव्यात उपचार सुरू होते.

 

श्री. पार्सेकर हे केवळ प्रशासकीय क्षेत्रातच नव्हे, तर भेडशीतील विविध सांस्कृतिक, सामाजिक व आध्यात्मिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणारे, मनमिळावू आणि सर्वांना आपलेसे वाटणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनाने गावाने एक जाणता नेता आणि समाजहितासाठी झटणारा कार्यकर्ता गमावला आहे.

 

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने भेडशी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.