नाविण्य मेस्त्री, प्रथमेश सामंत, निर्भया जाधव विजेते

भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद ; हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवणचे भव्यदिव्य आयोजन

मालवण | प्रतिनिधी : हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवणच्या वतीने रविवारी रात्री भरड नाका येथे आयोजित मालवणातील पहिल्या भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. नाविण्य मेस्त्री, प्रथमेश सामंत, निर्भया जाधव यांनी विविध गटात प्रथम क्रमांक प्राप्त केले. मान्यवर व आयोजक यांच्या वतीने सर्व विजेते व सहभागी स्पर्धक यांना सन्मानित करण्यात आले.

आपल्या धर्मातील उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करण्यावर भर द्यायला हवा. तरच आपला देश, समाज संघटित होईल आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला पुढे चांगले दिवस येतील. अन्यथा जाती-जातीमध्ये, प्रांता-प्रांतामध्ये, निरनिराळ्या भेदांमध्ये विभागले जाऊन शत्रू राष्ट्रे त्याचा गैरफायदा घेतील. त्यामुळे सर्वांनी सावध राहायला हवे असे प्रतिपादन ॲड. समीर गवाणकर यांनी यावेळी केले.

स्पर्धेचे उदघाटन पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी संयोजक प्रशांत हिंदळेकर, सहसंयोजक भाऊ सामंत, ॲड. समीर गवाणकर
पारितोषिक पुरस्कर्ते अन्वेशा आचरेकर, शिल्पा खोत, केदार झाड, चषक पुरस्कर्ते भूषण साटम, यांसह सुदेश आचरेकर, महेश कांदळगावकर, बबन शिंदे, यतीन खोत, दीपक पाटकर, संजय गावडे, हरी चव्हाण, आप्पा लुडबे, बंटी केनवडेकर, अमित खोत, अनिकेत फाटक, श्रीराज बादेकर, संदीप बोडवे, गणेश मेस्त्री, स्नेहा आचरेकर, स्मृती कांदळगावकर, महिमा मयेकर, तारका चव्हाण, मोहित झाड, राजू बिडये, मोहन वराडकर, ललित चव्हाण, हरिश पडते, गणेश चव्हाण, प्रसाद हळदणकर, स्वप्नील घाडी, अमोल गावडे, शुभम मेस्त्री, निनाद बादेकर, अमित मांजरेकर, योगेश पटकरे यांच्यासह अन्य सदस्य, पदाधिकारी मान्यवर यांच्यासह अन्य समिती सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविक भाऊ सामंत यांनी करताना कार्यक्रम आयोजन बाबतची संकल्पना स्पष्ट केली. मोठी स्क्रीन लावून भव्य दिव्य स्तरावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी ॲड. गवाणकर म्हणाले, आपण आपली परंपरा जपली पाहिजे. हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीने आपल्या धर्माचे जे वैशिष्ट्य आहे ते दर्शविणारा असा उत्सव आपल्या पद्धतीने साजरा करूया असे ठरविले हे योग्य आहे आणि या उत्सवात मालवणवासीयांनी उत्स्फूर्त संख्येने सहभागी होत चांगल्या उपक्रमाला पाठींबा दिला आहे. असेही गवाणकर म्हणाले.

पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या या उपक्रमाबाबत उत्स्फूर्त भुमिका मांडली. महाभारतामध्ये श्रीकृष्णाची भूमिका महत्त्वाची होती कारण त्यांनी सत्य, असत्य काय आहे हे त्यांनी महाभारतात दाखवून दिले आहे असे सांगत त्यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीने यावर्षीपासून जो उपक्रम हाती घेतला आहे, त्याला शुभेच्छा देण्याबरोबरच हा उपक्रम उत्तरोत्तर वाढत जावो, अशी सदिच्छा श्री. जगताप यांनी व्यक्त केली.

स्पर्धेचा निकाल

बालगट- प्रथम क्रमांक नाविण्य मेस्त्री, द्वितीय हृदयांश फाटक, तृतीय दक्ष मांजरेकर, उत्तेजनार्थ- अनुश्री मेस्त्री, अंश ढवाळी, हरमलकर ग्रुप, आसरा सातार्डेकर, विहान साळसकर. खुला गट पुरुष- प्रथम क्रमांक प्रथमेश सामंत, द्वितीय हार्दिक परुळेकर, तृयीय प्रसाद शिरोडकर. खुला गट महिला प्रथम क्रमांक निर्भया जाधव, द्वितीय रेवा जोशी, तृतीय हर्षदा पाडगावकर, उत्तेजनार्थ- अश्विनी आचरेकर, सई कांबळी. विशेष प्राविण्य- अनिता आळवे, सुरेखा बिलये यांना सन्मानित करण्यात आले.

परीक्षक म्हणून प्रफुल्ल देसाई, संजय शिंदे, शुभदा टिकम यांनी काम पाहिले. सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, चषक, प्रमाणपत्र तसेच सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वीतेसाठी यांच्यासह हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन करत विनोद सातार्डेकर यांनी आभार मानले. स्पर्धा संपल्यानंतर प्रथम विजेत्या स्पर्धकांच्या हस्ते नरकासुराचा प्रतिमेचे दहन करत श्रीकृष्णाचा जयजयकार करण्यात आला.