चौगुले मित्रमंडळ आयोजित नरकासुर स्पर्धेत चौगुलेवाडी मित्रमंडळाचा नरकासुर प्रथम.

ओटवणे (प्रतिनिधी)
चौगुले मित्रमंडळ ओटवणे गावठणवाडी आयोजित भव्य अशा दशक्रोशी मर्यादित नरकासुर स्पर्धेत ओटवणे चौगुलेवाडी मंडळाचा प्रथम क्रमांक, आकाश मेस्त्री, गावठणवाडी मित्रमंडळाने द्वितीय क्रमांक तर तारीवाडीच्या फायर स्कॉडमित्र मंडळाने तृतीय क्रमांक पटकाविला. तर या स्पर्धेत माजगाव कासारवाडा, ओटवणे चव्हाटा बाल मंडळ आणि ओटवणे आंबेडनगर हे सुद्धा उत्तेजनार्थ भक्षिसाचे मानकरी ठरले .
नरकासुर स्पर्धेच हे तिसर पर्व या पर्वालाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.ओटवणेतील या स्पर्धेत एका पेक्षा एक असे सरस, हालते व दृक श्राव्य नरकासुर स्पर्धकांनी सादर करीत रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या नरकासुर स्पर्धेला ओटवणे दशक्रोशीतील रसिकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच या स्पर्धेत ओटवणे रिद्धी सिद्धी ग्रुप, माजगाव दळवीवाडा मालवणी एक्सप्रेस, ओटवणे रमाईनगर यांचेही नरकासुर लक्षवेधी ठरले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण गावठणवाडी कला क्रिडा मंडळाचे अध्यक्ष उमेश गावकर, सामाजिक युवा कार्यकर्ते बबलू गावकर, पोलिस कॉन्स्टेबल मनोज राऊत, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बुराण, बाळा गावकर, एकनाथ गावकर, आनंद भैरवकर, रामा म्हैसकर, सिद्धेश ओटवणेकर, संतोष भैरवकर, मंगेश गावकर, नवीन भराडी, पत्रकार महेश चव्हाण आदी उपस्थित होते. या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे १०००२ रुपये, ७००२ रुपये, ३००२ रुपये तर उत्तेजनार्थ तिन्ही विजेत्यांना प्रत्येकी १००२ रुपयाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील पारितोषिके बबलू गावकर, उमेश गावकर, महेश गावकर यांनी पुरस्कृत केली होती.

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून जिल्हा मूर्तिकार संघाचे अध्यक्ष नारायण सावंत, मूर्तिकार अनंत मेस्त्री, मास्टर ऑफ क्राफ्टमन ओंकार मांजरेकर, युवा आर्टिस्ट रोहित वरेकर यानी काम पाहिले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी उदीत गावकर, प्रथमेश गावकर, तुषार गावकर, प्रमोद गावकर, सुनील गावकर, गजानन गावकर, प्रणव गावकर, विशाल गावकर, वेदांत गावकर, श्रेयस गावकर, ऋषिकेश गावकर, ओम गावकर, देविदास गावकर, देवेश भैरवकर, आनंद गावकर आदिनी मेहनत घेतली व स्पर्धा यशस्वी केली. या स्पर्धेत सहभागी सर्व मंडळांचे आयोजक चौगुले मित्रमंडळ आणि बबलू गावकर यांनी विशेष आभार मानले.