समुद्रात वादळ सदृश्य स्थिती : सागरी पर्यटन ठप्प ; मासेमारीवरही परिणाम
मालवण | प्रतिनिधी : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळ स्थितीच्या पार्श्वभूमीवर बंदर विभागाने तीन नंबरचा धोका दर्शविणारा बावटा जारी केला आहे. 50 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची स्थिती आहे. त्यामुळे नौकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या त्यानुसार पर्यटन, मासेमारी सह सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूहीच्या नौका कोळंब खाडी व अन्य सुरक्षित ठिकाणी नौका नेण्यात आल्या.
वादळी परिस्थितीमुळे खबरदारीच्या सूचना मालवण बंदर विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत. जल पर्यटन तसेच मच्छीमारांना मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये. असे सूचित करण्यात आले. ऐन पर्यटन हंगामात वादळी हवामानाचा फटका पर्यटन व्यवसायावला बसला आहे. दिवाळी सुट्टीमुळे पर्यटकांची गर्दी मालवणात आहे. मात्र सागरी पर्यटन ठप्प झाल्याने त्याचा परिणाम झाला आहे.











