वेंगुर्ले : प्रतिनिधी
मठ परबवाडी येथील रस्ता कॉंक्रिटीकरण आणि संरक्षक भिंत बांधणे या कामाचे भूमिपूजन सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
वेंगुर्ले तालुक्यातील मठ परबवाडी सातेरी मंदिर ते यशवंत परब यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता कॉंक्रिटीकरण करणे व किशोर परब यांच्या घराशेजारील संरक्षक भिंत बांधणे अशी ही कामे आहेत. या कामाचा भूमिपूजन सोहळा ना. नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा तालुका अध्यक्ष पप्पू परब, मठ गावच्या सरपंचा सौ. रुपाली नाईक, उपसरपंच सौ सोनिया मटकर, ग्रामपंचायत सदस्य शमिका मटकर, सदस्य संतोष वायंगणकर, सोसायटी चेअरमन सुभाष बोवलेकर, शक्ती केंद्रप्रमुख विजय बोवलेकर, बूथ अध्यक्ष अनिल तेंडोलकर, उमेश धुरी, महेश धुरी, रवींद्र खानोलकर, अजित नाईक, उमेश मटकर, प्रकाश मोबारकर, दामू मटकर, स्वप्निल मटकर, मिलिंद मटकर, समीर मटकर, मनोहर मटकर, संतोष परब, सौरभ परब, किशोर परब, दिनेश नाईक, भूषण परब, प्रकाश परब, दिगंबर परब आणि परबवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.













