न्हावेली प्रतिनिधी
सावंतवाडी- मळेवाड मार्गावरील न्हावेली तिठा (आरोस तिठा) येथे आज दुपारी एसटी बस आणि बोलेरो गाडी यांच्यात समोरासमोर झालेल्या जोरदार अपघातात दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले. या घटनेमुळे काही काळ सावंतवाडी-आरोंदा मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.
आज दुपारी सुमारे साडेबारा वाजता हा अपघात झाला. सावंतवाडीहून आरोंद्याला जाणारी एसटी बस न्हावेली तिठा येथे आली असताना, समोरून आरोसमधून सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या बोलेरो गाडीची आणि तिची जोरदार टक्कर झाली.
या अपघातात एसटी बसमधील सर्व प्रवासी सुदैवाने सुरक्षित असून कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र, दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे. अपघातामुळे मार्गावरील वाहतूक काही तासांसाठी ठप्प झाली होती, ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास आणि गैरसोयीला सामोरे जावे लागले. स्थानिकांनी तातडीने मदतकार्य करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले











