महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ : उपांत्य फेरीचा सामना पाहण्याची खेडवासीय महिलांना सुवर्णसंधी

खेड (प्रतिनिधी) : भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत दमदार कामगिरी करत प्रवेश केला आहे. या उपांत्य फेरीत भारताचा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार असून, हा रोमांचक सामना ३० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी दोन वाजता नेरुळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगणार आहे.
भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी खेड तालुक्यातील महिला क्रिकेटप्रेमींना सामना प्रत्यक्ष पाहण्याची खास सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भारतीय जनता पार्टी, खेड यांच्या वतीने, खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री. वैभव सदानंद खेडेकर आणि सौ. वैभवी वैभव खेडेकर यांच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या विशेष उपक्रमांतर्गत महिला क्रिकेटप्रेमींसाठी सामन्याचे प्रवेश तिकीट, प्रवासासाठी गाडीची व्यवस्था, भारतीय संघाची जर्सी तसेच भोजनाची सोय करण्यात आली आहे. भारतीय महिला संघाला प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रोत्साहन देण्याची ही उत्तम संधी असल्याने खेड तालुक्यातील अनेक महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिला क्रिकेटप्रेमींनी आपली उपस्थिती निश्चित करण्यासाठी खालील प्रतिनिधींशी संपर्क साधावा असे आवाहन वैभव खेडेकर यांनी केले आहे.
श्री. नंदु साळवी (९४२२६२७९०९),
श्री. रहिम सहिबोले (८०८७५९७३३३),
श्री. मिलिंद (दादु) नांदगावकर (९१३०५३०५९४).