ओटवणे (प्रतिनिधी ) गेले काही दिवस बहू चर्चेत असणारा ओमकार हत्ती अखेर इन्सुलि बिलेवाडी मार्गे ओटवणे सीमेवार दाखल झाला. उद्योजक बागायतदार रवींद्र कुडाळकर यांच्या गेट जवळ येऊन पुनः माघारी फिरत इन्सुलि च्या दिशेने निघून गेला.ओमकार हत्ती गावात आला ही बातमी लागताच बघ्यांनी गर्दी करायला सुरुवात केली मात्र काही वेळातच ओमकारने इन्सुलि येथें मार्गक्रमण केले. वनविभाग आणि कर्मचारी यांची मात्र सध्या मोठी धांदल उडत असून ओमकार जिथं जाईल तिथे जावे लागत आहे. वनविभाग कर्मचारी ज्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न करत आहे त्या मार्गाने हत्ती जात असून मधेच आपली मर्जी वाटेल तिथे फिरत आहे.सध्या जरी इन्सुलि च्या दिशेने जात असला तरी ओटावणेत परतण्याची शक्यता आहे.










