आचरा हायस्कूल येथे शैक्षणिक साहित्य वाटप

आचरा | अर्जुन बापर्डेकर : सेवाभावी संस्था अ्ॅक्रॅश फाउंडेशन पुणे आणि अनिश राजन गुळगुळे, नेहा अनिश गुळगुळे (आचरा) यांच्या माध्यमातून धी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई संचलित न्यू इंग्लिश स्कूल आचराच्या विद्यार्थ्यांना शाला उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.यावेळी स्कूल समिती सदस्य संजय पाटील, मुख्याध्यापक गोपाळ परब यांसह अन्य शिक्षक आदी उपस्थित होते..