दहागाव हायस्कूल येथे चांद्रयान 3 चे प्रक्षेपण ..

मंडणगड | प्रतिनिधी : लाल बहादूर शास्त्री हायस्कूल दहागाव येथे प्रशालेतील मुलांना चांद्रयान 3 मोहिमेचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले.मुलांना प्रत्यक्ष यान कसे मार्गक्रमण करते .पृथ्वीच्या कक्षेत कसे जाते चंद्रावर गेल्यावर ते कसे स्थिर होते या बाबत विज्ञान शिक्षक श्री. इंगळे सर यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी व उपस्थितीत सर्व शिक्षकांनी भारताच्या या ऐतिहासिक क्षणाचा आनंद टाळ्या वाजवून व्यक्त केला.या अविस्मरणीय घटनेचे साक्षीदार सर्व विद्यार्थी व शिक्षक बनले.
या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. हुलगे सर,ज्येष्ठ शिक्षिका पालांडे मॅडम, नाटेकर मॅडम, शेले सर, जाधव सर, इंगळे सर इत्यादी शिक्षक उपस्थित होते.त्याच प्रमाणे श्री.गौड, व श्री. गुडेकर हे शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.