परुळे : प्रतिनिधी : विविध अभियानात उल्लेखनीय काम केलेल्या ग्रामपंचायती मध्ये परुळे ग्रामपंचायतीने विविध
उपक्रम राबवले आहेत. त्या मुळे या ठिकाणी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाचे प्रतिनीधी
भेट देऊन माहीती घेतात. आज पंचायत समिती मालेगाव जिल्हा वाशिम च्या टिमने ग्रामपंचायतीला भेट दिली. या समिती मध्ये सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद लोखंडे, सरपंच बाबांनराव मिट्करी,
मोहन वानखेडे, ग्रामसेवक ठरखेडा, यु.डी गावंडे,
ग्रामसेवक एम. के. घुगे, ग्रामसेवक अमोल जुंगादे, निखिल जारे यांचा समावेश होता. यावेळी सरपंच प्रणिती आंबडपालकर माजी सरपंच तथा सदस्य प्रदीप प्रभू उपसरपंच संजय दूधवडकर, ग्रामसेवक शरद शिंदे यांनी टिमचे स्वागत केले व विविध उपक्रमांची माहीती दिली. यावेळी व्यायामशाळा, काथ्या
प्रकल्प, शाळा, अंगणवाडी. सांडपाणी प्रकल्प,
कचरा संकलन शेड याची माहीती दिली. समितीने ही समाधान व्यक्त केले.