भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण
श्रीहरीकोटा : भारतीयांसाठी आजचा दिवस अभिमानाचा ठरला आहे. भारताच्या चांद्रयान-३ चे श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. एलव्हीएम-३ च्या सहाय्याने चांद्रयान-३ चे प्रक्षेपण करण्यात आले. आज दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी चांद्रयान-३ चे उड्डाण करण्यात आले. आता ४२ दिवसांनी हे यान चंद्राच्या भूमीवर उतरणार आहे.
चांद्रयान-३ चे यशस्वी उड्डाण झाल्यानंतर आणि ते पृथ्वीच्या इच्छित कक्षेत प्रस्थापित केल्यानंतर इस्रोच्या अध्यक्षांनी संपूर्ण देशाला ही आनंदाची बातमी दिली. त्याच बरोबर त्यांनी संपूर्ण देशाचे अभिनंदन केले.
चांद्रयान-३ चे प्रक्षेपण इच्छित कक्षेत मिशनसह यशस्वी झाले . LVM3 ने चांद्रयान-3 ला पृथ्वीभोवती इच्छित कक्षेत प्रस्थापित केले.