नूतन कार्यकारणी जाहीर
वैभववाडी प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार योजना समिती वैभववाडी तालुका अध्यक्षपदी श्री.अनंत संभाजी फोंडके यांची निवड करण्यात आली आहे. तसेच संजय गांधी निराधार योजना नुतन कार्यकारणी जाहीर झाली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या सूचनेनुसार ही कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.
संजय गांधी निराधार योजना समिती पुढीलप्रमाणे – अध्यक्ष, श्री. अनंत संभाजी फोंडके, सदस्य – श्री.स्वप्नील बाळासाहेब खानविलकर, श्री.सिध्देश दिलीप रावराणे, श्री.परशुराम सहदेव इस्वलकर, सौ.मानसी नितीन रावराणे, श्री.नवलराज विजयसिंह काळे, श्री. अभय बाळकृष्ण कांबळे, श्री. गणेश प्रकाश पवार, श्री.बाळकृष्ण बबन वाडेकर, श्री. उदय महादेव मुद्रस यांचा समावेश आहे. तसेच शासकीय प्रतिनिधी म्हणून तहसीलदार वैभववाडी, गटविकास अधिकारी वैभववाडी व मुख्याधिकारी नगरपंचायत वाभवे – वैभववाडी यांचा या समितीत समावेश आहे.
नुतन अध्यक्ष व सदस्यांचे नागरिकांमधून अभिनंदन करण्यात येत आहे.












