ओमकार हत्तीने अखेर ओटवणेत केली एन्ट्री.बघ्यांची मोठी गर्दी

 ओटवणे (प्रतिनिधी ) काल ओटवणे हद्दीत प्रवेश करून माघारी परतलेल्या ओमकारने अखेर आज ओटवणेत मांडवफारवाडी येथून एंट्री केली. काल संध्याकाळी इन्सुलि बिलेवाडी मार्गे उद्योजक बागायतदार रवींद्र कुडाळकर यांच्या गेट जवळ येऊन पुनः माघारी परतलेला ओमकार हत्ती गावात आला ही बातमी लागताच काल निराश होऊन परतलेल्या बघ्यांनी मात्र आज मोठी गर्दी केली. गेले आठ दिवस सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या आणि प्रत्येकाच्या स्टेटस ला असणाऱ्या हत्तीचे फोटो व्हिडिओ काढण्यासाठी कित्तेक जणांचे मोबाईल सरसावले.सर्वांसाठी हा कुतूहल आणि औत्सुक्याचा विषय असला तर पावसामुळे आधीच हवालदिल झालेल्या शेतकरी बांधवांसाठी गावात हत्तीची एंट्री म्हणजे अजून एक संकट वाटत आहे पावसामुळे थोडं फार उरलं सुरल पीक धोक्यात येत कि काय या विचाराने शेतकऱ्यांच्या काळजात धडकी भरली आहे. ओमकार ने सध्या तरी तस मोठं नुकसान केल नसल तरी नुकसान करण्याची शक्यताही असल्याने ओमकार चा जास्त काळ मुक्काम ओटवनेत नसावा अशी प्रार्थना सध्या शेतकरी बागायतदार करत आहेत. तसेच हत्ती बरोबर बघ्यांची होणारी गर्दी यावर नियंत्रण ठेवताना प्रशासकीय यंत्रणेला मात्र कसरत करावी लागत आहे. पोलीस दल वनविभाग यांसकडून जवळून सेल्फी फोटो तसेच हुल्लडबाजी करणाऱ्या लोकांना ताकीद दिली जात आहे. हत्ती असणाऱ्या ठिकाणा पासून दूर राहण्याच आवाहनही करण्यात येत आहे.वनविभाग कसोशीने सध्या हत्तीला सुरक्षित स्थळी पोहचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे