मंत्री शंभूराज देसाई यांचे आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केले आभार
मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील ख्रिस्ती धर्मियांचे आदरस्थान असलेल्या चिंदर डोंगरावरील स्टेपचर्च परिसर सुशोभीकरण करण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून प्रादेशिक पर्यटन योजनेतून ५० लक्ष एवढा निधी मंजूर झाला आहे.
या संदर्भात शिवसेना आचरा विभाग प्रमुख संतोष कोदे, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, व्हिक्टर फर्नांडिस, शिवसेना तालूकाप्रमुख विनायक बाईत यांनी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई तसेच आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.













