मसुरे | झुंजार पेडणेकर :घाडीगांवकर मराठा समाज विकास प्रतिष्ठान कल्याण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले घाडीगांवकर समाज बंधू भगिनी व परिवार व मित्रपरिवाराचे वार्षिक स्नेहसंमेल्लन आचार्य अत्रे नाट्यमंदिर कल्याण (पश्चिम) येथे यशस्वीपणे संपन्न झाले. या प्रसंगी लोकराजा श्री. सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूर कुडाळ यांचा ट्रिकसीन्स युक्त “जय जय रवळनाथ” नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. कार्यक्रमाला समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
प्रमुख अतिथींच्या हस्ते व मान्यवरांचे उपस्थितीत दिनदर्शिका २०२६ चे प्रकाशन करण्यात आले. घाडीगांवकर मराठा समाज विकास प्रतिष्ठान कल्याण संस्थेच्या वतीने आयोजित घरगुती गणेश सजावट २०२५ या स्पर्धेतील विजेते श्री. सुयश तुकाराम घाडी, कींजवडे प्रथम क्रमांक, श्री. संतोष चंद्रकांत घाडी, कुवळे द्वितीय क्रमांक, श्री. संजय पांडुरंग आचरेकर, कींजवडे तृतीय क्रमांक या विजेत्या स्पर्धकांचा नगरसेवक श्री. महेश गायकवाड यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात, नगरसेवक महेश गायकवाड, मठाधिपती श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान, खोटलेचे श्री. गणेश शांताराम घाडीगांवकर, श्री. सहदेव सीताराम दाभोळकर (उपाध्यक्ष, घाडीगांवकर सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई), श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाचे संचालक श्री. सिद्धेश कलिंगण, कलाकार श्री. पप्पू घाडीगांवकर, सचिन घाडीगांवकर आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सचिव श्री. सोमा भानू घाडीगांवकर यांनी करताना घाडीगांवकर मराठा समाज विकास प्रतिष्ठान, कल्याण” ही संस्था १५ वर्ष, गुणवंत विद्यार्थी यांचा गुणगौरव, मोफत वह्या वाटप, मुलांच्या कलागुणवत्तेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने विविध स्पर्धांचे व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, ज्येष्ठ समाजबांधवांचा सत्कार, सामाजिक सहल, वार्षिक स्नेहसंमेलन, महिलांसाठी हळदिकुंकू, वधू वर मेळावा असे विविध कार्यक्रम करून सातत्याने घाडीगांवकर परीवारास एकत्र बांधून ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे याचा विशेष उल्लेख केला.
स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी व समाज बांधवानी विशेष मेहनत घेतली.













