ओटवणे, सरमळे, विलवडे येथे पाहुणचार घेत ओमकार भलावल मधून तांबुळी मार्गे मार्गस्थ.

ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे गावात एंट्री करत एक दिवस आणि मध्यरात्री पर्यंत ओटवनेत पाहुणचार घेतलेला ओमकार मध्यरात्री सरमळे येथें पोहोचला आणि सकाळी सरमळे येथें वास्तव्य करत नंतर ओटवणे तिठा येथून विलवडे येथें प्रवेश केला मात्र येथून मार्गक्रमण करताना काही काळ मुख्य रस्त्यावर ठाण मांडून असल्याने वाहन चालकांची मात्र चांगलीच भंभेरी उडाली. विलवडे येथे काही वेळ थांबल्यानंतर संध्याकाळी भालावल येथे काही तास वास्तव्य केल्यानंतर 6 वाजता तांबूळी मार्गे पुढच्या दिशेने निघाला. काल पासून ओमकार हत्ती ओटवणे पंचक्रोशीत ठाण मांडून असल्याने ज्या गावात हत्ती जातो त्यातील लोक मोठ्या संख्येने त्याला पाहण्यासाठी गर्दी करत आहेत जणू आपल्या घरी एखादा नवीन पाहुणा यावा.भालावल येथे सुद्धा लोकांनी मोठी गर्दी केली होती. भलावल येथें मात्र जास्त वेळ वास्तव्य न करता ओमकार पुढे तांबूळी च्या दिशेला निघून गेला.वनविभाग आणि पोलीस दल ओमकार ला सुरक्षित स्थळी नेण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे.