खा. नारायण राणे यांचा आज

रत्नागिरीत जनता दरबार
रत्नागिरी : नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांनी जनता दरबाराचे आयोजन केले आहे. दि. 30 ऑक्टोबर रोजी 11 वाजता डी.पी.डी.सी. सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे तालुक्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी जनता दरबार होणार आहे. मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खासदार राणे यांनी विशेष प्रयत्न करावे यासाठी या जनता दरबारचे आयोजन आहे. नागरिकांनी आपले प्रश्न घेऊन जनता दरबारामध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.