गोळवण गावचा आदर्श गाव व प्रकल्प योजना आराखडा अंतिम!

मसुरे | झुंजार पेडणेकर : ग्रामपंचायत कार्यालय गोळवण – कुमामे – डिकवल येथे ग्रामसभा घेण्यात आली. सदर ग्रामसभेत सुमारे १५५ ग्रामस्थ उपस्थित होते.

सदर ग्रामसभेत सर्वांची योजना सर्वांचा विकास सन – २०२६/२७ चा ग्रामपंचायत आराखड्या बाबत चर्चा विनिमय होऊन आराखडा अंतिम करण्यात आला. सदरच्या सभेत तिन्ही गावातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे त्वरित फार्मर आयडी, ई – पीक पाहणी अँप याबाबत चर्चा करण्यात आली. सदर सभेत आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजना कामा बाबत चर्चा विनिमय होऊन आराखडा अंतिम करण्यात आला. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देणे कामे प्रयत्न करणारे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार श्री. नारायणराव राणे, पालकमंत्री श्री. नितेश राणे तसेच कुडाळ मालवण मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार श्री. निलेश राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला.

सदर सभेत उपस्थित ग्रामस्थांचे स्वागत ग्रामपंचायत अधिकारी सौ. प्रियंका मनवर मॅडम यांनी केले आभार प्रदर्शन सरपंच श्री. सुभाष लाड यांनी केले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सदर सभा संपन्न झाली.