Breaking: विश्वनगरमधे बिबट्या दिसल्यानंतर पोलिसांचे आवाहन

रत्नागिरी :

आज 19 डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता चे सुमारास नगरपरिषद वसाहत विश्वनगर रत्नागिरी येथे अमोल सावंत यांच्या आंब्याचे बागेत एका बिबट्याने एका बैलावर हल्ला केल्याची घटना घडली आहे.

तरी थिबा पॅलेस, विश्वनगर, आंबेशेत परिसरातील सर्व नागरिकांनी सतर्क राहावे व मॉर्निंग वॉक साठी एकटे दुकटे जाऊ नये. असे आवाहन रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातर्फे करण्यात येत आहे.

या परिसरात पहाटे मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्यांची संख्या जास्त आहे