मंत्रालयात नळपाणी योजनेच्या सादरीकरणाबाबत बैठक पार
अधिकाऱ्यांना वेळेत काम पूर्ण करण्याचे आदेश
सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात देवगड-जामसंडे नगरपंचायत अंतर्गत कोर्ले–सातर्डी नवीन नळपाणी योजनेच्या सादरीकरणाबाबत बैठक पार पडली. या बैठकीत पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी सदर नळपाणी योजनेची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीस जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रवींद्र खेबुडकर (दूरदृश्य प्रणालीद्वारे), देवगड नगरपंचायतच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती गौरी पाटील, देवगड व्यवस्थापकीय सल्लागार श्री राहुल सूर्यवंशी, नगरपंचायत अभियंता श्री विवेक खोत, महा जीवन कोकण विभागाचे मुख्य अभियंता श्री प्रशांत भामरे, श्री गजानन आलेवाड तसेच देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष श्री योगेश चांदोस्कर उपस्थित होते.









