अशी महिती वयोवृद्धांकडून दिली जाते. या दिवशी वाडीवस्त्यांवरून तांदूळ व पैसे गोळा केले जातात. यातून जंगलातील एका ठरलेल्या विशिष्ट ठिकाणी एकत्रितरित्या जेवण बनवले जाते. दोन उपवास धारकांना रंगरंगोटी करून त्यांची पूजा केली जाते.वाघ वाघिणी समजून त्यांना त्यानंतर ठरलेल्या अंतरापर्यंत पिटाळण्यात येते. तसेच यावेळी जवळील नदी- नाल्यात खेकडे मासे पकडून शिजविण्यात येतात आणि जेवणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात होतो. जंगलामध्ये जेवणाचा हा कार्यक्रम करण्यासाठी अनेक जण मोठ्या उत्स्फूर्तपणे यात सहभागी होतात. त्यावेळी जणू वनभोजनाचा आनंद लुटताना प्रत्येक जण दिसून येतो. हा सण दरवर्षी विविध ठिकाणी प्रथापरंपरेनुसार आजही साजरा केला जातो. असे केल्याने वाघ शांत होतो व गुरांना त्याचा त्रास होत नाही त्यांचे रक्षण होते अशी ग्रामस्थांची धारणा आहे. यावर्षी देखील तळवलीतील विविध वाड्यांमधून हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तळवली परिसरातील आगरवाडी, भेळेवाडी, डावलवाडी या वाड्यांमधील अबालवृद्ध मोठ्या हौसेने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.