प्रमोद जठार यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर होताच वैभवावाडीत भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष

वैभववाडी प्रतिनिधी :
भाजपा नेते, माजी आमदार प्रमोद जठार यांची विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वैभववाडी भाजपा कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर फटाके फोडून जल्लोष केला. तसेच एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, माजी सभापती नासीर काझी, उपसभापती साची कोलते, पं. स. सदस्य मंगेश लोके, बंडया मांजरेकर, माजी उपनगराध्यक्ष संजय सावंत, वैभववाडी भाजपा महिला अध्यक्ष प्राची तावडे, राजू पवार, डी.के. सुतार, संतोष पेडणेकर, प्रमोद सावंत, प्रदीप नारकर, आनंद नेवरेकर, उदय जैतापकर व कार्यकर्ते उपस्थित होते.