रत्नागिरी ः
तालुक्यातील तोणदे येथे गांजा सदृश्य अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या संशयिताविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवार 6 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.20 वा.सुमारास करण्यात आली.
साहिल भिकाजी आग्रे (27,रा.हनुमानवाडी तोणदे,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हवालदार रोशन सुर्वे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित हा गुरुवारी दुपारी तोणदे गावातील नवालाई मंदिराच्या बाजूने जाणाऱ्या छोट्या रस्त्याच्या बाजुला असलेल्या वडाच्या झाडाखाली गांजा सदृश्य अमली पदार्थाचे सेवन केलेल्या अवस्थेत मिळून आला. त्याच्या विरोधात एन.डी.पी.एस ॲक्ट कलम 8 (क),27 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











