रत्नागिरी ः
रत्नागिरी ते पावस जाणाऱ्या रस्त्यावरील कोहीनूर हॉटेलच्या मागे गांजा हा अमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने आपल्या ताब्यात बाळगणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार 5 नाव्हेबर रोजी रात्री 9.50 वा.सुमारास करण्यात आली.
मोहम्मद कैफ मुफीद भाटकर (25,रा.जामा मस्जिदजवळ राजीवडा,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात सहाय्यक पोलिस फौजदार दिपक साळवी यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवारी रात्री संशयित हा आपल्या ताब्यात 6 हजरी 500 रुपयांचा 124 ग्रॅम गांजा हा अमली पदार्थ विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. संशयिताविरोधात एन.डी.पी.एस ॲक्ट कलम 8 (क),20 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.













