आत्ममंथनाचा दिव्य संदेश पसरवत ७८वा वार्षिक निरंकारी संत समागम संपन्न

रत्नागिरीसह मुंबई व महाराष्ट्रातील लाखों भाविक सहभागी

आत्मसुधार करत जगामध्ये शांतिसुखाचे वातावरण तयार करावे- निरंकारी सद‌्गुरु माता सुदीक्षाजी महाराज समालखा

चिपळूण (प्रतिनिधी) : संत निरंकारी मिशनचा ७८वा वार्षिक निरंकारी संत समागम सद‌्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन छत्रछायेखाली ३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा (हरियाणा) येथे आध्यात्मिकतेच्या मंगलमय वातावरणात संपन्न झाला. ६५०ह एकरांच्या विशाल मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या संत समागमामध्ये देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने भाविक भक्तगणांनी सहभागी होऊन भक्तीमय वातावरणाचा आनंद प्राप्त केला. या संत समागमाचा मुख्य विषय होता ‘आत्ममंथन’. रत्नागिरीसह मुंबई व महाराष्ट्रातून या समागमामध्ये लाखो भाविकांनी भाग घेतला, त्यामध्ये हजारोंच्या संख्येने सेवादल बंधुभगिनी आणि अन्य सेवादार भक्तांचाही समावेश होता. ज्यांनी समागमाच्या विविध सेवांमध्ये आपले महत्वपूर्ण योगदान दिले.
समागमाचा शुभारंभ सद‌्गुरु माताजींनी मानवतेच्या प्रति दिलेल्या दिव्य संदेशाने झाली. त्यामध्ये माताजींनी सांगितले की, मानवाने मानवतेचा मार्ग स्वीकारावा, स्वतःचे अंतरंग सदोदित शुद्ध करत जावे, जेणेकरून त्याची व्याप्ती वाढत जाऊन संपूर्ण बाह्य जगात सुधारणा घडेल आणि सगळीकडे शांतीसुखाचे वातावरण स्थापित होईल. सद‌्गुरु माताजी म्हणाल्या, की आत्ममंथन ही अंतरंगातील एक यात्रा आहे. यास केवळ विचार, मन आणि बुद्धीच्या स्तरावर जाणले जाऊ शकत नाही. यासाठी आपल्या अंतरंगात आध्यात्मिक स्वरूपात चिंतन करण्याची गरज आहे. प्रत्येक मानवाच्या अंतःकरणात आणि बाह्य जगात एक सत्य निवास करते जे स्थिर आणि शाश्वत आहे. हे सत्य प्रथम जाणले पाहिजे. जेव्हा मानवाला प्रत्येकाच्या अंतरंगातील या सत्याचे दर्शन होईल, तेव्हा त्याचा मनात प्रत्येकाविषयी प्रेमभाव उत्पन्न होईल. तत्पूर्वी, समागम स्थळी आगमन होताच समागमात उपस्थित समस्त मानव परिवाराच्या वतीने सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांचे स्वागत संत निरंकारी मंडळाच्या कार्यकारिणीतील वरिष्ठ सदस्यांकडून पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. त्यानंतर या दिव्य जोडीला फुलांच्या सजावटीने सुशोभित खुल्या पालखीमध्ये विराजमान करून समागम पंडालच्या मध्यभागातून मुख्य मंचापर्यंत एका भव्य शोभायात्रेच्या रूपात नेण्यात आले. मुख्य मंचाजवळ पोहोचताच, संत निरंकारी इन्स्टिट्यूट ऑफ म्युझिक अँड आर्ट्सच्या २५०० हून अधिक विद्यार्थ्यांकडून भरत नाट्यम नृत्याद्वारे स्वागत गीताचे गायन करण्यात आले. ते दृश्य अत्यंत विलोभनीय होते.
समागमाच्या दुसऱ्या दिवसाचा शुभारंभ एका भव्य सेवादल रॅलीने झाला. या आकर्षक रॅलीमध्ये रत्नागिरीसह संपूर्ण भारतभरातून तसेच परदेशातून आलेल्या सेवादलातील बंधु-भगिनींनी हजारोंच्या संख्येने सहभाग घेतला. या रॅलीत जिथे शारीरिक व्यायाम, खेळ आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाद्वारे निःस्वार्थ सेवाभावाची प्रस्तृती करण्यात आली, तिथेच मिशनच्या शिकवणींवर आधारित लघुनाटिका सुद्धा सादर केल्या गेल्या. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सेवादल भगिनी-बंधूंना आपले आशीर्वाद प्रदान करताना सतगुरु माताजी म्हणाल्या, की एक भक्त हा चोवीस तास सेवादारच असतो; तथापि, जेव्हा वर्दी परिधान करून सेवा केली जाते, तेव्हा त्याची जबाबदारी अनेक पटींनी वाढते. समागमाच्या दुस-या दिवशी सायंकाळी उपस्थित विशाल मानव परिवाराला आपले आशीर्वाद प्रदान करताना सत्गुरु माताजी म्हणाल्या, की आत्ममंथन ही केवळ साधी विचार करण्याची प्रक्रिया नसून, स्वतःच्या अंतर्मनात डोकावण्याची एक साधना आहे, जी परमात्म्याच्या अनुभूतीमुळे सहज सुलभ होऊ शकते. समागमाच्या तिस-या दिवशी उपस्थित लाखोंच्या विशाल मानव परिवाराला संबोधित करताना सत्गुरु माताजी म्हणाल्या, की केवळ भौतिक संसारामध्ये रमणे किंवा आध्यात्मिक उन्नतीच्या नावाखाली संसाराचा त्याग करणे या दोन्ही बाबी अत्यंत टोकाच्या आहेत. संतांनी सदोदित मध्यम मार्गाचा उपदेश केला आहे.
समागमाच्या दुसऱ्या दिवशी निरंकारी राजपिता रमितजींनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, की परमात्म्याबद्दल अनेक भिन्न भिन्न दृष्टिकोन पाहायला व ऐकायला मिळतात. वास्तविक परमात्मा हे एक असे सार्वभौमिक सत्यसत्य आहे जे सदैवकाळ सत्य राहते. हे सत्य जाणण्याचा अधिकार प्रत्येक मानवाला आहे. समागमात हरियाणाचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे आगमन समागमाच्या दुसऱ्या दिवशी हरियाणाचे माननीय राज्यपाल प्रोफेसर असीम कुमार घोष यांनी आपल्या धर्मपत्नीसह समागमामध्ये येऊन सतगुरु माताजी व निरंकारी राजपिताजी यांचे आशीर्वाद प्राप्त केले व त्यांच्या प्रति आपला आदरभाव व्यक्त केला. आपल्या संबोधनामध्ये त्यांनी संत निरंकारी मिशनच्या दिव्य विचारधारेची व मानवतेच्या प्रति केल्या जाणाऱ्या निष्काम सेवांची स्तुती केली.
समागमाच्या तिसऱ्या दिवशी हरियाणाचे माननीय मुख्यमत्री श्री.नायब सिंह सैनी यांनी या प्रसंगी आपल्या भावना प्रकट करताना म्हणाले, की निरंकारी मिशन आत्ममंथन, आत्मसुधार व समाज निर्मितीचे प्रेरणास्रोत आहे. इथे समस्त भेदभावांच्या पलीकडे जाऊन मानवाला मानव बनण्याची शिकवण दिली जाते. आध्यात्मिक जागृती बरोबरच मिशन समाज कल्याणाच्या कार्यांमध्ये अनुकरणीय योगदान देत असून ही बाब अत्यंत प्रशंसनीय आहे असे ते म्हणाले. या वर्षीचा संत समागम हा चार दिवसांचा होता ज्याचे समापन सोमवारी रात्री सत्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य प्रवचनाने झाले, ज्यामध्ये सत्गुरु माताजींनी सांगितले, की ईश्वराने हे जग अत्यंत सुंदर बनविले आहे आणि मानवाने त्याचा आनंद अवश्य घ्यायचा आहे. तथापि, आपल्या विवेक बुद्धीचा वापर करुन प्रभुनिर्मित सृष्टीतील समस्त वस्तूंचा सदुपयोग करावा, दुरुपयोग करु नये.
शेवटी, सद‌्गुरु माताजींनी निरंकारी भक्तगणांना आवाहन केले, की चार दिवसाच्या या संत समागमामध्ये जे आत्ममंथन झाले आहे, जी दिव्य शिकवण प्राप्त झाली आहे ती रात्रंदिवस, जीवनभर आपल्या जीवनात उतरवून स्वतःचे कल्याण साधण्याबरोबरच इतरांचेही कल्याण करत जावे. तत्पूर्वी, समागम समितीचे समन्वयक तथा संत निरंकारी मंडळाचे सचिव आदरणीय जोगिंदर सुखीजाजी यांनी सत्गुरु माताजी, निरंकारी राजपिताजी तसेच समस्त साध संगत आणि समागमासाठी सहकार्य करणाऱ्या सरकारी यंत्रणांचे हार्दिक आभार प्रकट केले. कवि दरबार या संत समागमामध्ये प्रत्येक दिवशी कवि दरबार कार्यक्रम आयोजित करण्यात आला ज्यामध्ये विद्वान बालक, महिला व पुरुष मिळून एकंदर 38 कवींनी हिंदी, पंजाबी, इंग्रजी, हरियाणवी, मुलतानी, उर्दु आणि मराठी भाषांमधून ‘आत्ममंथन’ या विषयावर आपापल्या कविता सादर केल्या ज्याची श्रोत्यांनी खूप प्रशंसा केली. संत समागमामध्ये आधुनिक तंत्रज्ञान व विद्युत रोषणाईचा वापर करुन अत्यंत सुंदर प्रदर्शनी तयार करण्यात आली होती, जी भाविक-भक्तगणांच्या आकर्षणाचे केंद्र बनून राहिली. भाविकांच्या सुविधेसाठी ही प्रदर्शनी मुख्य प्रदर्शनी, बाल प्रदर्शनी वं संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशनची प्रदर्शनी अशा तीन भागांमध्ये विभाजित करण्यात आली होती. समागम सुरु होण्याआधीपासून ही प्रदर्शनी समागम संपेपर्यंत भाविकांसाठी रात्रंदिवस खुली होती जिचा लाभ लाखो भाविकांनी प्राप्त केला.