शिवशक्ती भीमशक्ती च्या मार्गावर देश चालला पाहिजे!

सिंधुदुर्गात सामाजिक ऐक्याचे नवे पर्व.

 पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी

शिवशक्ती व भीमशक्ती च्या मार्गावर देश चालेल. देशाचे संविधान व लोकशाहीतील जबाबदाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळाल्या. त्याचा वापर प्रत्येक घटकासाठी करता आला. वंचित घटकासाठी, दुर्लक्षित समाजासाठी आपण काम करू शकलो. माझा कोणी वैयक्तिक शत्रू नाही. समाजाच्या हितासाठी पक्ष विसरून समाजासाठी सर्व एकत्र आला व हितकारिणी महासंघ स्थापन केला त्याबद्दल मी आपले सर्वांचे कौतुक करतो. असेच एकत्र राहून माझ्याकडून समाजाचे काम करून घ्या मी आपल्या सोबत आहे असे विचार राज्याचे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गनगरी येथे केले

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २५ रस्ते व १९२ वाड्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा ऐतहासिक निर्णय घेतल्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांचा सत्कार समारंभ सिंधुदुर्ग जिल्हा संविधानिक हितकारिणी महासंघामार्फत येथील पत्रकार भवन मध्ये पालकमंत्री नितेश राणे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता विजयकुमार सर्वगोड यांनीही या विषयात लक्ष घालून काम केले. याबद्दल मंत्री नितेश राणे यांनी या अधिकारांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, संविधानिक हितकारिणी महासंघाचे अध्यक्ष महेश परुळेकर, कार्याध्यक्ष रमाकांत जाधव, जिल्हा संघटक अंकुश जाधव , गौतम खुडकर, शंकर जाधव,रामदास जाधव ,जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, आदी मान्यवर व जिल्हाभरातून महासंघाचे सदस्य व मागासवर्गीय वंचीत समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री ना.राणे पुढे बोलताना म्हणाले की पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून वेगवेगळ्या पक्षातील लोक एकत्र आले व समाजाच्या विकासासाठी अराजकीय संविधानिक हितकारिणी महासंघ स्थापन केला गेला हे खरोखरच जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा आहे या महासंघाच्या पाठीशी आपण कायम राहू जिल्ह्याच्या आणि वंचीत समाजाच्या विकासासाठी नेहमीच आपण पाठीशी राहून भविष्यात त्यांना विकास झालेला दिसेल याची ग्वाही देतो असे म्हणाले.

वंचीत समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी निवडणूक आचारसंहिता संपताच जनता दरबार घेतला जाणार आहे शिवशक्ती आणि भीमशक्तीवर चालणारा आपला देश आहे आपल्या जिल्ह्यालाही विकसित जिल्हा पुढे न्यायचे आहे त्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे आपण दहा वर्षे विरोधी पक्षात राहिलो पण आता साताधारी पक्षात असून वर्षभरात पालकमंत्री म्हणून अनेक जनहिताचे निर्णय घेतले त्यामुळे अनेकांची झोप उडाली आहे त्यामुळे विरोधक निर्माण झाले आहेत पण जिल्ह्यातील शेवटच्या माणसाचा विकास होईपर्यत शांत न बसता लोकहिताचे काम सुरूच ठेवणार असे पालकमंत्री म्हणाले तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणे संपूर्ण राज्यात जातीवाचक रस्ते व वाड्यांची नावे बदलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे लक्ष वेधणार त्यादृष्टीने कार्यवाही सुद्धा सुरु झाल्याचे सांगितले.जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनीही तात्काळ आदेश काढण्याचे चांगले काम केल्याचे ते म्हणाले

संविधानिक हितकारिणी महासंघाचे अध्यक्ष महेश परुळेकर बोलताना म्हणाले की हा महासंघ स्थापन होण्यापूर्वी आम्ही वेगवेगळ्या पक्षात काम करत असताना एकमेकांची तोंडे पण बघत नव्हतो पण समाजाच्या विकासासाठी एकत्र आलो निशितच त्याचा फायदा होऊ लागला आहे त्यामुळे यापुढे आपल्यावर कुणी किती टिका केली तरी समाजाच्या हितासाठी जे जे करता येईल ते करणार त्यासाठी वाटेल ती किमंत मोजावी लागली तरी चालेल पण महासंघाच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडविणार असे सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 25 रस्ते व 192 वाड्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा ऐतहासिक निर्णय घेतल्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांचा आणि या प्रश्नासाठी पाठपुरावा करणारे निवृत्त कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचा सत्कार करण्यात आला तसेच वंचीत समाजातील सरपंच ,नगरसेवक यांचाही सत्कार करण्यात आला