कोकण आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सपत्नीक घेतले आरवली येथील श्री. वेतोबा देवाचे दर्शन

वेंगुर्ले l दाजी नाईक :कोकण आयुक्त श्री. डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सपत्नीक वेंगुर्ले तालुक्यातील आरवली येथील प्रसिद्ध श्री देव वेतोबा देवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा श्री देव वेतोबा देवस्थान समिती तर्फे अध्यक्ष श्री. जयवंत राय यांनी त्याचे शाल, श्रीफळ देवून स्वागत केले.

सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले कोकण आयुक्त श्री सूर्यवंशी. हे वेंगुर्ले येथे आले असता त्यांनी आरवली येथे भेट दिली. यावेळी आरवली येथील श्री देव वेतोबा ची सर्वदूर पसरलेली ख्याती, नवसास पावणारा देव व देवाच्या पाद‌त्राणा विषयी सविस्तर माहीती कोकण आयुक्त श्री. डॉ. सूर्यवंशी यांनी देवस्थान कडून जाणून घेतली. तसेच देवस्थानचा परिसर, भक्तीमय वातावरण व सुसुत्र व्यवस्थापन याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री जयवंत राय, वेंगुर्लेचे तहसीलदार ओंकार ओतारी, देवस्थानचे श्री. सचिन दळवी, पोलिस पाटील श्री मधुसूदन मेस्त्री, मंडल अधिकारी श्री. मयेकर, तलाठी श्री गावडे आदि यावेळी उपस्थित होते.