कट्टा खालची गुरामवाडी येथील घटना
मालवण | प्रतिनिधी : कट्टा खालची गुरामवाडी येथे चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्यानी रोहिणी रमेश गुराम (वय 65) या वृद्ध महिलेचा खून केल्याची घटना सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. घटनेनंतर हल्लेखोर चोरटे पळून गेले असे बोलले जात आहे.
दरम्यान, गंभीररित्या जखमी अवस्थेतील त्या महिलेला शेजारी व नातेवाईक यांनी ग्रामीण रुग्णालय पेंडुर कट्टा येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मयत घोषणा केली. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पंचनामा व पुढील तपास सुरु आहे. मात्र, हल्लेखोर चोरट्याचा तात्काळ शोध घेऊन कठोर कारवाई झाली पाहिजे अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांसह ग्रामस्थांनी घेतली होती.












