रत्नागिरी । प्रतिनिधी
रत्नागिरी शहरातील मांडवी येथील भुते नाका परिसरात अत्यंत भयंकर घटना घडली आहे
एका व्यक्तीवर निर्घृण वार करण्यात आले आहेत
अरमान इनामदार राहणार मिरकरवाडा असे जखमीचं नाव आहे
संशयित आरोपीचे नाव अंकुश मांडवकर रा. मांडवी असे आहे
दारूच्या नशेत तेथील त्याने एका व्यक्तीच्या मानेवर, बरगडी, डोक्यावर वार केले असल्याची माहिती पुढे येत आहे
यात अरमान अत्यंत गंभीर जखमी झाली असून त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे
ही घटना सोमवारी संध्याकाळी ७.४० च्या दरम्यान घडली
वार करणारा तरुण हा मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती पुढे येत असून तो तेथीलच रहिवासी आहे
मद्याने बेभान झालेल्या तरुणाने वाटेत येणाऱ्या प्रत्येकाला हल्ला करण्याचा प्रयत्न केला
यात गंभीर जखमी व्यक्ती सापडला आणि ही घटना घडली असावी असे सांगितले जात आहे













