वेंगुर्ले उभादांडा येथे ११ हजार रुपयांचा गांजा जप्त: एक जण ताब्यात : वेंगुर्ले पोलिसांची कारवाई 

वेंगुर्ले : दाजी नाईक :वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा, बागायतवाडी येथे वेंगुर्ले पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये येथील प्रसाद प्रकाश तुळसकर वय ३२ याच्या जवळ सुमारे ११ हजार रुपये किमतीचा गांजा सदृढ अमली पदार्थ आढळून आला. मुद्देमालासह पोलिसांनी त्याला रात्री ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग श्री मोहन दहिकर, उप विभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी विभाग, श्री विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या अमली पदार्थ विरोधी मोहीम सुरू आहे. वेंगुर्लेचे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी आपल्या पथकासह तालुक्यात याबाबत कारवाई करत असताना रात्री मिळालेल्या माहितीनुसार उभादांडा बागायतवाडी येथे सदर अमली पदार्थ मिळून आला आहे. त्यामुळे गुंगीकारक औषधी द्रव्य व मनो व्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधि.1985 चे कलम 8(c), 20(B)(ii)(a) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पथकामध्ये पोलीस निरीक्षक श्री निसर्ग ओतारी, पोलीस उपनिरीक्षक श्री योगेश राठोड, पोलीस हवालदार श्री योगेश सराफदार, योगेश राऊळ, चालक श्री जोसेफ, पोलीस नाईक श्री स्वप्निल तांबे

पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग खडपकर, मनोज परुळेकर, प्रथमेश पालकर, जयेश सरमळकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल गौरी तामानेकर, होमगार्ड धुरी, गिरप आदी सहभागी झाले होते. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करत आहेत.