बॉम्बची अफवा करून न्यायालयीन कामकाजात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न

सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनतर्फे धमकीच्या कृत्याचा तीव्र निषेध

सावंतवाडी : सोमवार
​दिनांक ०२ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विविध न्यायालयांच्या वेबसाईटवर मेलद्वारे बॉम्बने न्यायालये उडवून देण्याची भ्याड धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. या भ्याड कृत्यामुळे न्यायालयीन कामकाजात विनाकारण व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, या सर्व दुष्कृत्याचा सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. अशा भ्याड धमक्यांमुळे डगमगून न जाता सर्व वकील बंधू-भगिनींनी कोणतीही भीती न बाळगता आपले दैनंदिन न्यायालयीन कामकाज नेहमीप्रमाणे सुरळीतपणे चालू ठेवावे, असे आवाहन जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक आणि पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. या गंभीर प्रकारामुळे कायदेशीर वर्तुळात खळबळ उडाली असली, तरी वकिलांनी धैर्याने परिस्थितीचा सामना करत कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.