एस. आर. दळवी (I) फाऊंडेशन वैभववाडी अध्यक्षपदी संदेश तुळसणकर : सचिवपदी राजेश कळसुलकर

वैभववाडी टीचर फोरम’ची घोषणा, कार्यकारिणी जाहीर

वैभववाडी l प्रतिनिधी :        एस. आर. दळवी (I) फाऊंडेशनच्या वैभववाडी तालुकानवीन कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. संस्था संस्थापक श्री. रामचंद्र दळवी आणि सौ. सीता दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्याध्यक्ष श्री. महेश सावंत आणि जिल्हाध्यक्ष श्री चेतन बोडेकर यांच्या प्रयत्नातून वैभववाडी तालुक्याची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षक श्री. संदेश तुळसणकर यांची तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. उपाध्यक्ष – श्री. अर्जुन जयवंत बोरकर व श्रीमती. निलोफर मौला शेख, सचिव – श्री. राजेश कानु कळसुलकर, सहसचिव – श्री. गणेश जयराम सावंत, सल्लागार – श्रीमती. संध्या संदीप शेळके, श्री. प्रफुल तुकाराम जाधव यांची निवड जाहीर झाली आहे.

     एस. आर. दळवी फाऊंडेशन या संस्थेमार्फत सर्वांचे अभिनंदन करण्यात आले असून पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या आहेत. नूतन अध्यक्ष संदेश तुळसणकर म्हणाले, शिक्षक सक्षमीकरण व पर्यावरण संवर्धन हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम केले जाईल. शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारा कोणीही व्यक्ती मग तो अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक किंवा उच्च शिक्षण या कोणत्याही गटातील असला तरी तो संस्थेच्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतो.

जिल्हाध्यक्ष चेतन बोडेकर म्हणाले, ही संस्था कोणत्याही प्रकारची शिक्षक संघटना नाही. शिक्षकाचा व्यावसायिक विकास व्हावा, त्यांना शिक्षण क्षेत्रातील नवनवीन संधी उपलब्ध व्हाव्यात, शिक्षकांमधील सुप्त कलागुणांचे प्रकटीकरण व्हावे, म्हणून विविध स्पर्धा तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे विविध उपक्रम राबविणारी आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करणारी ही संस्था आहे. संस्थेच्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन संस्थेला सहकार्य करावे,

   यावेळी मोठ्या संख्येने संस्था पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.