मालवण नगरपरिषद निवडणूक : अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही
मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक 2025 साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. पहिल्या तीन दिवसात नगराध्यक्ष अथवा नगरसेवक पदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.
मालवण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पालिकेचे मुख्याधिकारी प्रतीक थोरात हे काम पाहत आहेत. उमेदवार अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने भरायचे असून त्यानंतर उमेदवारी अर्ज भरल्याची प्रिंट तसेच अन्य कागदपत्रे संबंधित उमेदवाराने येथील पालिकेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करायचे आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने पालिकेत पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. 17 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.













