रत्नागिरी : प्रतिनिधी
तालुक्यातील पानवल येथे तरुणाने अज्ञात कारणातून विष प्राशन करत आत्महत्या केली. ही घटना बुधवार 1 जुलै रोजी दुपारी 12 वा. सुमारास उघडकीस आली.
अविनाश अनंत घवाळी (33,रा.पानवल घवाळीवाडी, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अविनाशने बुधवारी दुपारी तेथील आंबा बागेत अज्ञात कारणातून विषारी औषध प्राशन केले. काहीवेळाने त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अविनाशला तपासून मृत घोषित केले. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.













