माजी उपसरपंच श्रीकांत डाफळे व असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
वैभववाडी l प्रतिनिधी : कोकिसरे बांधवाडी येथील उबाठाचे माजी उपसरपंच श्रीकांत डाफळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज भाजपात प्रवेश केला. वैभववाडी भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. प्रवेश करणाऱ्यांमध्ये प्रकाश डाफळे, प्रभाकर डाफळे, संतोष डाफळे, गणपत डाफळे, सचिन डाफळे, सुनील डाफळे, दीपक डाफळे, अनंत डाफळे व अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
कोकिसरे येथे हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, नासीर काझी, दिगंबर पाटील, राजेंद्र राणे, महीला अध्यक्ष प्राची तावडे, अक्षता डाफळे, बंड्या मांजरेकर, संजय सावंत, अतुल नारकर, सरपंच प्रदीप नारकर, दत्ताराम सावंत, दाजी पाटणकर, अनंत डाफळे, उपसरपंच समीक्षा पाटणकर व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.












